About Me

 

Write to me on:

anaghap@gmail.com

Follow me on :

Facebook • Twitter • Instagram

Anagha Paranjape Purohit

Architect and Environmental Planner

Driven by passion to provide concrete solutions for the environmental disruptions, Anagha Purohit, an Architect and Environmental planner is the Director of VK: e Environmental, Pune. She has worked for 15 years in India as well as in USA and Sweden in the field of Architecture and Urban Environmental Planning.

 

Anagha has completed her graduation in Architecture from University of Pune and her post-graduation in Environmental Planning from Arizona State University. Many a times, she tends to pen down on several environmental issues faced in the cities of India. Also, she is active in local urban politics and policy formulations for developing better urban plans and infrastructure.

 

She had contested the Civic elections 2012 from Ward 29, Bavdhan-Bhusari areas and procured 2800 votes, as an Independent candidate. Since then, she has been closely associated and connected with various citizen groups in these areas.

 

She has been one of the leaders in the Pune citizens’ movement against the Development Plan for the city. She has conducted numerous area sabhas in the year 2013-2014 to mobilize people to raise objections on the proposed Development Plan.

 

She aims to create a movement with the citizens of India to change the process followed for environment related issues and problems which are faced by the people of the city.

अनघा परांजपे पुरोहित

वास्तुविशारद व पर्यावरण कार्यकर्त्या

पर्यावरण ऱ्हासावर भरीव उपाय पुरवण्याच्या आकांक्षेने प्रेरित झालेल्या अनघा परांजपे -पुरोहित या वास्तुरचनाकार व पर्यावरण नियोजक असून पुण्यातील व्हीके ई-एनव्हॉयर्नमेंटल संस्थेच्या संचालक आहेत. त्यांनी भारत, तसेच अमेरिका व स्वीडनमध्ये वास्तुरचना आणि नागरी पर्यावरण नियोजन क्षेत्रांत १५ वर्षे काम केले आहे.

 

अनघा यांनी वास्तुरचना शाखेतील (आर्किटेक्चर) पदवी पुणे विद्यापीठातून, तर पर्यावरण नियोजन शाखेतील पदव्युत्तर पदवी ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतून पूर्ण केली आहे. भारतातील शहरांपुढे असणाऱ्या अनेक पर्यावरण समस्यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्या स्थानिक नागरी राजकारणात, तसेच उत्तम नागरी आराखडे व पायाभूत सुविधा विकासासाठीच्या धोरण आखणीत सक्रियही आहेत.

 

अनघा यांनी याआधी वर्ष २०१२ मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक २९ मधून (बावधन-भुसारी परिसर) लढवली असून त्यांना स्वतंत्र उमेद्वार म्हणून २८०० मते मिळाली होती. तेव्हापासून त्या या भागातील विविध नागरिक गटांशी घनिष्ठ संपर्क राखून कार्य करत आहेत.

 

त्या पुणे शहराच्या विकास आराखड्याविरुद्ध पुणे सिटीझन्सच्या चळवळीतील नेत्यांपैकी आहेत. वर्ष २०१३-१४ मध्ये त्यांनी प्रस्तावित विकास आराखड्यावर हरकती घेण्याकामी जनमत एकवटण्यासाठी अनेक परिसर सभा घेतल्या आहेत.

 

पर्यावरण संबंधित समस्या, तसेच नागरिकांपुढील समस्यांबाबत उपायांची पद्धत बदलण्यासाठी भारतीय नागरिकांची चळवळ उभी करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

Key Points:

• Member of various committees for urban environmental planning and has produced white papers in field of Urban Environmental Planning, particularly for Pune

• Visiting faculty in various colleges of Architecture in Pune as an Educator. Integrates the principles of Environmental design and Architecture in her courses

• Leads the Environmental Assessment team and presents real estate projects for Environmental Clearance in VK: e Environmental

• Validating authority for Eco Housing, a Trainer and Assessor for IGBC Rating systems and a Trainer for GRIHA

• ECBC Master Trainer and in VK: e, her team has undertaken the pilot ECBC projects by Bureau of Energy Efficiency, Government of India

• Successfully coordinated an academic progamme for Indian students and students of Royal University of Fine Arts, Stockholm in Sweden

• Work done to demystify Pune Metro though various articles and lectures

प्रमुख मुद्दे:

• नागरी पर्यावरण नियोजनासाठीच्या विविध समित्यांच्या सदस्य. नागरी पर्यावरण नियोजन क्षेत्रात विशेषतः पुण्यासाठी अनेक श्वेत पत्रिका प्रकाशित

• शिक्षण तज्ज्ञ या नात्याने पुण्यातील विविध वास्तुरचना महाविद्यालयात आमंत्रिक अध्यापक. आपल्या अभ्यासक्रमांत पर्यावरण रचना वास्तुरचना या विषयांतील तत्त्वांचा समन्वय.

• पर्यावरण आढावा गटाचे नेतृत्व आणि व्हीके एन्व्हॉयर्नमेंटल संस्थेत पर्यावरणीय मंजुरीसाठी रिअल इस्टेट प्रकल्पांचे सादरीकरण

• इको हाऊसिंगसाठीच्या प्रमाणन तज्ज्ञ, आयजीबीसी मानांकन प्रणालीच्या प्रशिक्षक विश्लेषक, जीआरआयएचए साठी प्रशिक्षक

• इसीबीसी मास्टर ट्रेनर. व्हीके एन्व्हॉयर्नमेंटमध्ये त्यांच्या संघाने भारत सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीचा चाचणी इसीबीसी प्रकल्प हाती घेतला आहे.

• भारतीय विद्यार्थी, तसेच स्वीडनमधील स्टॉकहोमच्या रॉयल युनिव्हर्सिटी ऑफ फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन केले आहे.

• विविध लेख व्याख्यानांमधून पुणे मेट्रो हा विषय सामान्यांना उकलून सांगण्याचे कार्य.